मुंबई

भात खरेदी केंद्र सुरू

CD

भात खरेदी केंद्र सुरू
कुडूस येथील शेतकऱ्यांना दिलासा

वाडा, ता. २४ (बातमीदार) : आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार कार्यालयांतर्गत येत असलेल्या कुडूस येथील भात खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. २३) शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महामंडळाच्या नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवरील नोंदणीतील अडचणी तसेच यंदाच्या हंगामातील भातखरेदी सुरू होण्यास झालेला विलंब यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कुडूस येथे यावर्षी नव्याने भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची होणारी फरपट थांबली आहे. यामुळे जवळपास १२ किमी अंतराचा फेरा येथील शेतकऱ्यांचा वाचला आहे. यंदाच्या हंगामासाठी भात खरेदीसाठी २,३६९ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून हेक्‍टरी कमाल २३.१७ क्विंटल भात खरेदी केले जाणार आहे. मात्र यंदा भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणत्याही बोनसची घोषणा करण्यात आलेली नाही. कुडूस केंद्रावर २५ डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात झाली होती. मागील २० दिवसांत या केंद्रावर ५०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती केंद्रचालक प्रदीप जाधव यांनी दिली. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील, कुडूस शहरप्रमुख प्रकाश शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील, तालुकाप्रमुख प्रमोद पाटील, शरद चौधरी, अरुण पष्टे, मधुकर चौधरी, केंद्रचालक प्रदीप जाधव आदींसह महिला शेतकरीही उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT