मुंबई

गटई कामगारांचा आंदोलन इशारा

CD

गटई कामगारांचा आंदोलनाचा इशारा
नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई परिसरातील गटई कामगारांच्या जागा व परवाना वाटपाचा विषय नियमात असतानाही परवाने देण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही रखडपट्टी तात्काळ थांबवली नाही तर येत्या काळात गटई कामगार तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा नवी मुंबई चर्मकार संस्थेने दिला आहे.
गटई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई चर्मकार संस्थेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाची प्रत सादर करीत परवाना वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परवाना वाटपात दिरंगाई करणाऱ्या मालमत्ता व परवाना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
या भेटीत संस्थेचे अध्यक्ष भानुदास राजगुरू, सचिव राजाराम खाडे, विभागप्रमुख चंद्रकांत शिंदे, सदस्य सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटखे, संकेत डोके, मधुकर शिंदे, अजित कांबळे आदी उपस्थित होते. प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT