मुंबई

प्रजासत्ताक दिनासाठी खादी तिरंग्यांच्या मागणीत वाढ

CD

प्रजासत्ताकदिनासाठी खादी तिरंग्यांच्या मागणीत वाढ
गृहनिर्माण सोसायटीमध्ये सर्वाधिक विक्री
नितीन बिनेकर ः   सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : स्वदेशी विचार व राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या खादीच्या तिरंग्यांची मागणी या वेळी वाढली आहे. मुंबईतील खादी ग्राम उद्योगाच्या विविध केंद्रांतून आतापर्यंत दीड हजारांहून अधिक खादी राष्ट्रध्वजाची विक्री झाली असून, यामध्ये सर्वाधिक वाटा मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या आणि शासकीय कार्यालयांचा असल्याचे केंद्रातून सांगण्यात आले.

मुंबईतील प्रमुख खादी विक्री केंद्र म्हणून ओळख असलेल्या फोर्ट येथील खादी ग्राम उद्योग केंद्रात प्रजासत्ताकदिनाच्या काही दिवस आधीपासूनच राष्ट्रध्वज खरेदीसाठी लगबग असल्याचे चित्र आहे. गृहनिर्माण संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी येथे राष्ट्रध्वज खरेदीसाठी केंद्रात हजेरी लावत आहेत.
खादी ग्राम उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ६ बाय ९ फूट आकाराच्या राष्ट्रीय ध्वजांची विक्री सर्वाधिक झाली आहे. मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि निवासी संकुले आपल्या इमारतींवर फडकविण्यासाठी या आकाराच्या राष्ट्रध्वजाला जास्त पसंती देत आहेत. ४ बाय ६ फूट आकाराच्या राष्ट्रध्वजाला विशेषतः शासकीय कार्यालयांकडून अधिक मागणी आहे.

रायगडावरील तिरंग्याचा मान कुलाब्याला
प्रजासत्ताकदिनानिमित्त रायगड किल्ल्यावर फडकणारा सर्वात मोठा तिंरगा फोर्ट येथील खादी ग्राम उद्योग केंद्रातूनच पाठवण्यात आला आहे. या तिरंग्याचा आकार १४ बाय २१ फूट असून, तो महाराष्ट्राच्या इतिहासातील मानबिंदू असलेल्या रायगडावर फडकविण्यात येतो. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला हा ध्वज घेऊन जातात आणि तोच ध्वज १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फडकवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर खादीचा तिरंगा फडकणे, हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे खादी ग्राम उद्योग केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

प्रजासत्ताकदिनानिमित्त यंदा खादीच्या राष्ट्रध्वज खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतोय. मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांकडून मागणी वाढली आहे. यामुळे खादी घरोघरी पोहोचत आहे.
- जगदीश रुपवते, सहाय्यक व्यवस्थापक, मुंबई खादी ग्राम संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT