मुंबई

सीआयएसएफची ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन’

CD

सीआयएसएफची ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन’
२८ जानेवारीला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई, ता. २४ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन- २०२६’च्या दुसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यासाठी सज्ज आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे बुधवारी (ता. २८) नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल राष्ट्रीय स्टेडियम येथून वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सीआयएसएफ ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन- २०२६’ला व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतील. सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय एकता बळकट करण्याच्या उद्देशाने ही एक ऐतिहासिक राष्ट्रीय मोहीम आहे.
भारताच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर २५० हून अधिक बंदरे आहेत. त्यामध्ये ७२ आयात-निर्यात बंदरे समाविष्ट असून ती देशाच्या सुमारे ९५ टक्के व्यापाराचे व्यवस्थापन करतात. ही बंदरे, किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरी, शिपयार्ड आणि अणुऊर्जा प्रकल्पांसह, भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत; मात्र ड्रग्ज, शस्त्रे, स्फोटके यांची तस्करी, घुसखोरी आणि इतर बेकायदा कारवाया अशा सातत्याने उद्भवणाऱ्या धोक्यांनाही त्यांना सामोरे जावे लागते. पाच दशकांहून अधिक काळापासून सीआयएसएफकडे १२ प्रमुख बंदरे तसेच किनारपट्टीवरील इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
‘वंदे मातरम’ या भावनेने प्रेरित ही मोहीम राष्ट्रीय अभिमान, एकता आणि भारताच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सामूहिक जबाबदारीचे प्रतीक आहे. ही सायक्लोथॉन २५ दिवसांची ६,५५३ किलोमीटरची सायकल मोहीम असून ती भारताच्या संपूर्ण मुख्य भूभागावरील समुद्रकिनारा व्यापणार आहे. त्यामुळे ही देशातील आतापर्यंतच्या सर्वांत व्यापक किनारा सायकल मोहिमांपैकी एक ठरणार आहे.


१३० कर्मचारी सहभागी होणार
सीआयएसएफचे सायकलस्वार दोन गटांमधून एकाच वेळी पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा अशा दोन वेगवेगळ्या भागात रवाना होतील. या सायक्लोथॉनमध्ये १३० सीआयएसएफ कर्मचारी सहभागी होणार असून, त्यामध्ये ६५ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनी एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे सखोल प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT