मुंबई

शाळेत रंगला खाद्य महोत्सव

CD

चव, कौशल्य आणि व्यवहारज्ञानाचा मेळा
कासा जिल्हा परिषद शाळेत रंगला खाद्य महोत्सव

कासा, ता. २४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, स्वयंपाक कौशल्य आणि सांघिक भावना विकसित व्हावी या उद्देशाने कासा येथील जिल्हा परिषद शाळेत खाद्य महोत्सव पार पडला. शनिवारी (ता. २४) सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळेच्या एकूण ४०० विद्यार्थी संख्येपैकी सुमारे १५० विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टॉल उभारून सहभाग नोंदवला. अनेक पालकांनीही उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला. शाळेच्या आवारात छोटेखानी बाजारपेठ उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत विक्री केली. वस्तूंचे दर ठरवणे, पैशांचा व्यवहार, स्टॉलची मांडणी करणे, ग्राहकांना समजावून सांगणे अशा अनेक गोष्टींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे अभ्यासाबरोबरच जीवनोपयोगी व्यवहारज्ञान शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, व्यावसायिक समज विकसित होते आणि सामाजिक संवाद कौशल्यात सुधारणा होते, असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका गीता भावर यांनी व्यक्त केले. खाद्य महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना खरेदी–विक्रीचे व्यवहार, वस्तूंचे भाव समजून घेणे, ग्राहकांशी संवाद साधणे यांसारखे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. शिक्षणासोबतच आनंद आणि अनुभव देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

---------------
चौकट

चविष्ट पदार्थांनी भरली बाजारपेठ

या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध चविष्ट व आरोग्यदायी पदार्थ तयार करून विक्रीस ठेवण्यात आले होते. भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ, पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच ताज्या भाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा यात समावेश होता. समोसा, बटाटा वडा, इडली, भेळ, पुरणपोळी, गुलाबजाम यासारख्या पदार्थांना चांगली मागणी होती. लिंबूपाणी व रूह अफजा यासारख्या थंड पेयांनीही उकाड्यात दिलासा दिला. मेथी, शेपू, पालक, वालपापडी यासारख्या भाज्यांचे पदार्थही विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सादर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT