मुंबई

आयटीआय मुंबईत इनोव्हेशन लॅब

CD

आयटीआय मुंबईत इनोव्हेशन लॅब

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः आयटीआय मुंबई येथे आरसीबी-आयटीआय इनोव्हेशन लॅबचे उद्‌घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने यासाठी पुढाकार घेतला आहे. भविष्यासाठी सज्ज व्यावसायिक शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या तसेच उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. शहरातील आरसीबीने सहकार्य केलेली ही पहिलीच आयटीआय आहे.
या उद्‌घाटन सोहळ्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष बिमल मेहता तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वर्मा यांनी सांगितले, की ही अत्याधुनिक इनोव्हेशन लॅब युवकांना भविष्यकालीन गरजांसाठी सज्ज करण्यासाठी आणि त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेसोबतची ही भागीदारी स्वयंसेवी संस्थांना अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
बिमल मेहता म्हणाले, आरसीबी-आयटीआय इनोव्हेशन लॅब ही व्यावसायिक शिक्षण भविष्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. शिका- उभारा- अमलात आणा या संकल्पनेवर आधारित ही लॅब प्रकल्पाधारित शिक्षण, प्राध्यापक प्रशिक्षण आणि उद्योग मार्गदर्शनावर भर देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

SCROLL FOR NEXT