मुंब्र्यात महिला पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचा उत्साह
सावित्रीबाई फुले जयंतीसह माघी गणेशोत्सवानिमित्त हळदीकुंकूचे आयोजन
मुंब्रा, ता. २४ : महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत मुंब्रा येथील समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर (मराठी माध्यम) आणि ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल (इंग्रजी माध्यम) या शाळांमध्ये महिला पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर माघी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात आले.
शाळेचे अध्यक्ष सतीश देसाई आणि सेक्रेटरी समीर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. कार्यक्रमास शाळेच्या उपाध्यक्षा शिवानी देसाई, खजिनदार प्रवीणा देसाई, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन ढाके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हेमंत नेहते तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका पूर्वा गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये ‘पुठ्ठा पदन्यास’, ‘फुगा फुगवून फोडणे’ आणि ‘टिकल्या चिकटवणे’ यांसारख्या मनोरंजक व कौशल्यपूर्ण खेळांचा समावेश करण्यात आला होता. ‘पुठ्ठा पदन्यास’ या स्पर्धेत सीमा सचिन सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर रुकसाना नदाफ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. ‘फुगा फुगवून फोडणे’ या स्पर्धेत स्वप्ना नितीन निगम यांनी प्रथम तर फरीन फातिमा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ‘टिकल्या चिकटवणे’ या स्पर्धेत रेखा लहू होरकटे यांनी प्रथम, तर सुनीता धिरेंद्र पाल यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या सहशिक्षिका सरिता सोनवणे यांना ठाणे महापालिकेचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हळदीकुंकू कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना तिळगूळ व वाण देऊन स्नेहभाव वाढविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.