मुंबई

अनधिकृत बांधकामासाठी साहित्यपुरवठा करणारा टेम्पो जप्त

CD

ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : कळवा वन परिमंडळाच्या हद्दीत सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधात ठाणे वन विभागाने धडक कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामासाठी साहित्यपुरवठा करणारा टेम्पो जप्त केला असून, चालकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे वन क्षेत्रातील अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कळवा (घोलई नगर) येथील राखीव वन क्षेत्रातील गट क्रमांक ९७/अ मध्ये विटांचा बेकायदा पुरवठा सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईची आखणी करून कळवा वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे (वनपाल) व त्यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी बांधकाम साहित्याची वाहतूक करणारा टेम्पो रंगेहाथ पकडण्यात आला. तपासादरम्यान या टेम्पोमधून राखीव वन क्षेत्रात अतिक्रमणासाठी विटांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला असून टेम्पोचालक कमलेश विश्वकर्मा याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत वन परिमंडळ अधिकारी प्रवीण आव्हाड, वनरक्षक तुषार कळोखे, कृष्णा पोले, जितेंद्र देशमुख आणि सुनील गावित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT