मुंबई

थकबाकीदारांना पालिकेचा दणका

CD

अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पालिकेने आता थेट जप्तीची कारवाई सुरू केली आहे. घरपट्टी व इतर करांचा भरणा न करणाऱ्या सुमारे एक लाख ४० हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील कर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
२०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात पालिकेला अंदाजे ५९ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १० कोटी रुपयांचा कर भरणा झाल्याने पालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडला आहे. परिणामी, अजूनही सुमारे ४९ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने कायद्यानुसार कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. नोटीस मिळाल्यानंतर निर्धारित मुदतीत कर न भरल्यास संबंधित मालमत्तेवर जंगम व स्थावर मालमत्ता जप्ती, नळजोडणी व वीजपुरवठा खंडित करणे; तसेच पुढील टप्प्यात मालमत्तेचा लिलाव करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे कर अधीक्षक नरेंद्र संखे यांनी सांगितले.
दरम्यान, ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यानंतर थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई होणार असल्याचा कडक इशारा अंबरनाथ नगर परिषदेने दिला आहे.

कोणतीही तडजोड नाही
कर भरणा न झाल्यास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहराच्या विकासकामांसाठी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व नागरी सेवांसाठी मालमत्ता कर मुख्य महसूल स्त्रोत असून, नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक नरेंद्र संखे यांच्यामार्फत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT