मुंबई

रायगडच्या राजकारणाची दोरी तरुणांच्या हाती

CD

रायगडच्या राजकारणाची दोरी तरुणांच्या हाती
राजकीय पक्षांकडून युवावर्गाला प्राधान्य; अनेक तरुण चेहऱ्यांना उमेदवारी
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) ः गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त होत होती. यंदा मात्र राजकीय पक्षांनी ही अपेक्षा प्रत्यक्षात उतरवली आहे. इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए, कृषी पदवीधर, तसेच सामाजिक शास्त्रांचे शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे प्रचाराची भाषा, मुद्दे आणि कार्यपद्धती यामध्येही लक्षणीय बदल दिसून येत आहे.
राजकारणातही तरुणांचा सहभाग असावा, या उद्देशाने तसेच तरुणांच्या हाती सत्ता आल्यास वेगळे चित्र असेल त्याचा प्रत्यय या वेळच्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पारंपरिक, अनुभवी चेहऱ्यांऐवजी यावर्षी युवावर्गाला प्राधान्य देत अनेक पक्षांनी तरुण-तरुणींना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे हे उमेदवार केवळ वयाने तरुण नसून उच्चशिक्षित, आधुनिक विचारसरणीचे आणि सामाजिक कार्याची पाश्र्वभूमी असलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष मोठ्या प्रमाणात वेधले गेले असून, जिल्ह्यात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा उमेदवारांकडून विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडले जात आहे. रोजगारनिर्मिती, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, डिजिटल सेवा, पाणीपुरवठा, रस्ते व सार्वजनिक सोयीसुविधा हे मुद्दे त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, थेट जनसंवाद, घराघरांत जाऊन चर्चा आणि पारदर्शक राजकारणाची भूमिका यामुळे हे उमेदवार मतदारांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहेत.
महिलांनाही यंदा मोठ्या प्रमाणावर संधी मिळाल्याने निवडणुकीचे चित्र अधिक व्यापक झाले आहे. उच्चशिक्षित तरुणी आत्मविश्वासाने प्रचार करत असून, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि कुटुंबकल्याण यांसारख्या विषयांवर ठोस भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यामुळे महिलावर्गातूनही या निवडणुकीबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नव्या पिढीकडे ऊर्जा, शिक्षण आणि बदल घडवण्याची क्षमता आहे. तरुणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबाबदारी घेतल्यास प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास ज्येष्ठांकडून व्यक्त केला जात आहे.
..............
चैकट
नगरपालिका निवडणुकीतील प्रयोग यशस्वी
मागील महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी तरुण चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती, त्यात ते यशस्वीही झाले. यामध्ये अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक, मुरूडमधील अजित पवार गटाचे मंगेश दांडेकर यांची कन्या आराधना दांडेकर, रोह्यातून समीर शेडगे यांची कन्या वनश्री शेडगे यांचा समावेश आहे. त्यांना जनतेने भरघोस मतांनी विजयी केल्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT