मुंबई

आचारसंहिता संपताच शहराचे विद्रुपीकरण सुरू

CD

आचारसंहिता संपताच शहराचे विद्रुपीकरण सुरू
राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची वाढली डोकेदुखी
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आणि कांदिवली परिसर काही काळ बॅनरमुक्त झाला होता. रस्ते, चौक, नाके, सिग्नल, दुभाजक, सुशोभीकरण केलेले चौक तसेच स्कायवॉक परिसर मोकळा श्वास घेत होते. मात्र, निकाल जाहीर होताच राजकीय पक्षांनी विजयाच्या तसेच पराभवानंतर आभार मानण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा बॅनरबाजी सुरू केली असून, संपूर्ण परिसर विद्रूप झाला आहे.
राजकीय पक्ष, विविध मंडळे, संस्था तसेच स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून बिनदिक्कतपणे बॅनर लावले जात आहेत. यामुळे कांदिवली विभागातील उद्याने, चौक, नाके, सिग्नल, दुभाजक, पर्जन्य वृक्ष, पालिका शाळा आणि स्कायवॉक परिसर विद्रूप होत आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले सौंदर्यीकरण बॅनरबाजीमुळे अक्षरशः झाकोळले जात आहे.
पालिकेचे कर्मचारी एका वाहनातून दिवसाला दोन-तीन विभागांत कारवाई करत बॅनर काढतात. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा नव्याने बॅनर झळकतात. तक्रारी झाल्यानंतरच कारवाई होते आणि बहुतांशी वेळा राजकीय पक्षांचे खासदार, आमदार किंवा नगरसेवकांकडूनच पुन्हा बॅनरबाजी केली जाते, असा नागरिकांचा आरोप आहे.
मार्गांवरील दुभाजक आणि विजेच्या खांबांवर लावलेले बॅनर फाटून लटकत राहतात. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, २२ जानेवारीपासून माघी गणेशोत्सव सुरू झाला असून, मंडळांचे देणगीदार असलेल्या विकसक तसेच सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांकडून प्रवेशद्वारे, कमानी आणि मुख्य चौकांत मोठमोठे फलक उभारले जात आहेत. आधीच वाहतुकीची कोंडी असलेल्या मार्गांवर त्यामुळे आणखी कोंडी वाढत आहे.
यासंदर्भात आर/दक्षिण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेशकुमार सिंग यांच्याशी तीन-चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. सामाजिक कार्यकर्ते यतीन भिंगार्डे यांनी सांगितले की, “बॅनरबाजीवर कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने पालिकेवर यापूर्वी ताशेरे ओढले आहेत. तरीही आजवर ठोस, कडक आणि निर्णायक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नियम प्रभावीपणे राबवले जात नसल्यामुळे बॅनरबाजी आणि परिसर विद्रुपीकरणाचे दुष्टचक्र असेच सुरू राहणार आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT