महापौरपदाची निवडणूक लांबणीवर
भाजप, शिवसेना नगरसेवकांची अद्याप नोंदणी नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. दरम्यान, ३१ जानेवारीला नवा महापौर विराजमान होईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते; मात्र भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी झाली नसल्याने महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेना युतीला मुंबई महापालिकेत निर्विवाद बहुमत मिळाले. भाजपाला सर्वाधिक ८९, तर शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या. बहुमत असूनही महायुतीचा महापौर ठरलेला नाही. भाजप महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असून, त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. शिवसेना शिंदे पक्षही या पदासाठी अडून बसला आहे. महापौरपद, स्थायी समिती, सुधार समिती तसेच विशेष समित्यांसाठी शिंदे पक्ष आग्रही आहे.
शिवसेनेसोबत अद्याप एकमत न झाल्याने मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ३१ जानेवारीला मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र या अडचणी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.