मुंबई

इम्तियाज जलील यांच्या विधानाने खळबळ

CD

संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू!
इम्तियाज जलील यांच्या विधानाने खळबळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ ः मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान केले. हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगरसेविका सहर शेख यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही त्यांनी केला.
ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवारी मिळालेल्या सहर शेख या विजयी झाल्यानंतर ‘मुंब्रा हिरवा करायचा आहे’ या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी आज मुंब्र्यात सहर शेख आणि अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. या वेळी जलील यांनी सहर शेख यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. कारवाई करायची असेल, तर ती माझ्यावर करा, असा थेट इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, जलील यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
----
दरम्यान, सहर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या कथित स्पष्टीकरणावरून जलील यांना विचारले असता, त्यांनी ठाम भूमिका मांडली. हिरवा हा शब्द दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. झाडे, पर्यावरण आणि विकासाच्या संदर्भातही हिरवा शब्द वापरला जातो, मग या विधानाकडे त्या दृष्टीने का पाहिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT