मुंबई

नवीन मुख्यालयातून महापौरांचा कारभार

CD

नवीन मुख्यालयातून महापौरांचा कारभार
वसई-विरार पालिकेच्या मुख्यालयात प्रथमच बसणार
विरार, ता. २५ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेचे मुख्यालय पूर्वी विरार पूर्वेला होते; परंतु मुख्यालयाचे उद्घाटन झाल्यापासून प्रशासक तथा आयुक्त काम पाहत होते. त्यामुळे नव्याने उभारलेल्या मुख्यालयात प्रथमच महापौर शहराचा कारभार पाहणार आहेत.
वसई-विरार पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन १० जुलै २०२३ला प्रशासकीय राजवटीत करण्यात आले होते. नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये आतापर्यंत महापौर बसले नव्हते. आता निवडणुका झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवड होणारा महापौर मुख्यालयात प्रथमच बसणार आहे. महापौरांबरोबरच इतर सभापती, नगरसेवक प्रथमच मुख्यालयात दाखल होणार आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून महापौर, पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
-----------------------------
अधिकाऱ्यांकडून पाहणी
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी चौथ्या मजल्यावर महापौर दालन, उपमहापौर दालन, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, महासभा सभागृह, स्थायी समिती अशा विविध कार्यालयांना भेटी देत पाहणी केली. या वेळी शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता सतीश सूर्यवंशी, नगरसचिव विश्वनाथ तळेकर, माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख हर्षल राऊत, विविध प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT