मुंबई

सीमारेषा पिल्लर बांधकाम वादाच्या भोवर्यात

CD

सीमारेषा पिल्लरचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात
निकृष्ट कामाचा पर्दाफाश
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : नवगाव येथील वन विभागाच्या जागेत सुरू असलेले सीमारेषा पिल्लरचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक आरोप संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंभे यांनी केला आहे. पिल्लरच्या बांधकामात सिमेंटऐवजी जंगलातील दगड आणि ग्रीट पावडरचा वापर करून शासनाचा निधी हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण वन विभागाच्या वतीने नवगाव परिसरात वन विभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी पिल्लर उभारण्याचे काम सुरू आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंभे हे जंगलात गस्त घालत असताना त्यांना या कामात मोठी अनियमितता दिसून आली. पिल्लरच्या आत सिमेंटच्या काँक्रिटऐवजी जंगलातील साधे दगड भरले जात असल्याचे निदर्शनास आले. पिल्लरला बाहेरून केवळ ग्रीट पावडरचा लेप लावून ते सुस्थितीत असल्याचे भासवले जात होते. संशय आल्याने टेंभे यांनी स्वतः एक पिल्लर फोडून पाहणी केली असता, त्यातील भोंगळ कारभार समोर आला.

"शासकीय निधी हडप करण्याच्या उद्देशाने ठेकेदार आणि वनविभागाचे अधिकारी यांनी संगनमत करून हे निकृष्ट काम केले आहे," असा थेट आरोप दिलीप टेंभे यांनी केला आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, वनक्षेत्रपाल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या तक्रारी संदर्भात लवकरच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असल्याचेही टेंभे यांनी स्पष्ट केले.

तातडीने कामाची पाहणी
कल्याण वन अधिकारी आखाडे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नवगाव येथील कामाची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. कामाचा दर्जा राखला जाईल याची खबरदारी घेतली जाईल आणि त्रुटी आढळल्यास योग्य त्या सूचना केल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT