मुंबई

क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनातून २२ लाखांचा गंडा

CD

क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनातून २२ लाखांचा गंडा
उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ‘४० दिवसांत पैसे दुप्पट’ करण्याचे प्रलोभन दाखवून १५ ते २० जणांना २२ लाखांहून अधिक रुपयांना लुटणाऱ्या सराईत ठगाला हिललाइन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुकेश मोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीही मुंब्रा परिसरात कोट्यवधींच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी मुकेश मोरे आणि त्याची पत्नी अर्चना मोरे यांनी मिळून गुंतवणुकीची एक बनावट योजना आखली होती. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के परतावा आणि ४० दिवसांत मुद्दल दुप्पट करून देण्याचे प्रलोभन त्यांनी नागरिकांना दाखवले होते. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना छोटी रक्कम परतावा म्हणून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. लोकांकडून १० हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक गोळा केल्यानंतर आरोपी अचानक पैसे देणे बंद करून पसार झाला. पैसे मिळत नसल्याने आणि आरोपी फरार झाल्याने त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनीच त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पुन्हा तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे नवीन प्रलोभन दाखवत आरोपीला उल्हासनगरमध्ये बोलावून घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रभावती संजय माळी यांच्या तक्रारीनुसार हिललाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीची पत्नी अर्चना मोरे हिचा या घोटाळ्यातील सहभाग तपासला जात आहे. आरोपी मुकेश मोरे हा सराईत गुन्हेगार असून, मुंब्रा येथेही त्याच्यावर मोठे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी अवास्तव परतावा देणाऱ्या कोणत्याही संशयास्पद योजनेत पैसे गुंतवू नयेत. फसवणूक झाल्यास किंवा अशा योजनांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT