मुंबई

‘अरुणोदय’ विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा

CD

‘अरुणोदय’ विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा
डॉ. सुहास माने यांची पालघर जिल्ह्यास भेट

पालघर, ता. २५ (बातमीदार) : सिकलसेलमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘अरुणोदय सिकलसेल विशेष तपासणी मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा तथा विभागीय नोडल अधिकारी डॉ. सुहास माने यांनी पालघर जिल्ह्यास भेट दिली होती.
या वेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे अंतर्गत भोईरपाडा येथील सिकलसेलग्रस्त रुग्णांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन त्यांच्या आरोग्याची पाहणी केली. रुग्णांना सिकलसेल आजाराबाबत आवश्यक काळजी, नियमित औषधोपचार घेण्याचे महत्त्व याविषयी समुपदेशन केले. तसेच सिकलसेल रुग्णांना देण्यात आलेल्या ओळखपत्र वितरणाची पाहणी करण्यात आली. कोणतीही अडचण भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे येथे तपासणीसाठी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी रुग्णांच्या समस्या व अडचणींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच सिकलसेल रुग्ण व वाहक यांना प्रत्यक्ष गृहभेटी देऊन त्यांना नियमित औषधोपचार मिळत आहेत का? याची खात्री करावी, रुग्ण व वाहकांचे योग्य समुपदेशन करावे आणि दोन रंगीत कार्डधारक व्यक्तींनी परस्पर विवाह करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल आजाराबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या आढावा बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. वैदही माळवी, विनोद रडे , डॉ. महेश जाधव इंदल जाधव (जिल्हा सिकलसेल समन्वयक) तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT