मुंबई

विद्यार्थ्यांना शिवरायांच्या प्रशासकीय कौशल्याचे धडे

CD

विद्यार्थ्यांना शिवरायांच्या प्रशासकीय कौशल्याचे धडे
गुरुनानक महाविद्यालयाचा शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक दौरा

धारावी, ता. २५ (बातमीदार) : सायन येथील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त)च्या राजकारण शास्त्र विभाग आणि संविधान क्लबतर्फे एसवायबीए, टीवायबीए राज्यशास्त्र तसेच एमए सार्वजनिक प्रशासनाच्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याचा शैक्षणिक दौरा केला. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अभूतपूर्व प्रशासकीय कौशल्य आणि स्वराज्य स्थापनेच्या तत्त्वांची माहिती देणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट होते.
राजकारण शास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक सुमीत खरात यांनी ही संकल्पना मांडली. संविधान क्लब समन्वयक प्राध्यापक अनिकेत उबाळे यांनी आयोजनासाठी प्रयत्न केले. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्याची रचना, सामरिक महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेली प्रशासकीय व्यवस्था जसे अष्टप्रधान मंडळ, महसूल प्रणाली आणि न्याय व्यवस्था यांचा सखोल अभ्यास केला. हा दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञानवर्धकच नव्हता, तर राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणारा ठरला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर कौर भाटिया आणि विभागाने विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यात असे आणखी कार्यक्रम घेण्याची घोषणा केली.

दौऱ्याची प्रमुख उद्दिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय मॉडेलचे प्रत्यक्ष अनुभवातून आकलन करणे, ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन राजकीय इतिहास आणि लोकशाही मूल्यांची समज वाढवणे, विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागरूकता आणि संविधानिक मूल्यांबाबत जागृती निर्माण करणे, सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक दृष्टिकोनाशी जोडून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे ही या दौऱ्याची प्रमुख उद्दिष्टे होती.

फोटो - 495

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT