मुंबई

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा

CD

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची दुरवस्था
प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप
डोंबिवली, ता. २५ (वार्ताहर) : दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती २७ जानेवारीला संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना, डोंबिवलीत त्यांच्याच नावाने असलेल्या उद्यानाची मात्र अत्यंत दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचा विळखा, डासांची पैदास आणि दुर्गंधीमुळे येथील उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील मॉडेल स्कूलजवळ असलेले हे उद्यान २००२ मध्ये उभारण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या निधीतून याचे सुशोभीकरणही झाले. सद्य:स्थितीत मात्र महापालिकेचा कंत्राटी सुरक्षा रक्षक येथे उपस्थित नसल्याने उद्यानाचे नियोजन कोलमडले आहे.

सुरक्षा रक्षक नसल्याने उद्यान केवळ सकाळी दोन-तीन तास उघडे ठेवले जाते. तसेच झाडांना पाणी मिळत नाही आणि सुरक्षेच्या अभावामुळे उद्यानात प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी करीत आहेत. उद्यानाला लागून असलेल्या पावसाळी गटारात ड्रेनेजचे सांडपाणी साचले आहे. एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून गटाराचे काम अर्धवट सोडण्यात आले असून, काम करताना सांडपाणी वाहिन्या फुटल्याने हे पाणी उद्यानाच्या परिसरात पसरले आहे. यामुळे परिसरात उग्र वास येत असल्याने नागरिकांना उद्यानात थांबणे कठीण झाले आहे.

डासांचा प्रादुर्भाव
साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होत असल्याने परिसरात आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी आणि शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, मंदार स्वर्गे यांनी एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे; मात्र जयंती जवळ येऊनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. निवडणुकीपूर्वी अनेक इच्छुक उमेदवारांनी येथे साफसफाईचे फोटो काढले, पण आता कोणीही फिरकायला तयार नाही. साहेबांच्या जयंतीच्या दिवशी तरी हे उद्यान स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त मिळेल का, अशी अपेक्षा त्रस्त रहिवासी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT