अर्नाळा किल्ला परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन
आमदारांचा नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद
विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई विधानसभेतील अर्नाळा किल्ला प्रवासी धक्का परिसरात स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामांचे भूमिपूजन रविवारी (ता. २५) आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते पार पडले.
भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये अर्नाळा किल्ला प्रवासी धक्का ते श्री कालिका माता मंदिर पोचरस्ता व तत्सम रस्त्यांचे बळकटीकरण करणे, तसेच अर्नाळा किल्ला प्रवासी धक्का ते परशुराम म्हात्रे पोचरस्ता काँक्रीटीकरण करणे या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचा समावेश आहे. या कामांमुळे अर्नाळा परिसरातील स्थानिक नागरिक, व्यापारी, भाविक तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने अर्नाळा किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व सुरक्षित होणार असून, पावसाळ्यातील अनेक समस्यांपासून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या वेळी महाराष्ट्र समुद्र मंडळाचे उपअभियंता सुनील भांगरे, कार्यकारी अभियंता पाटोळे, बंदर निरीक्षक नवनीत निजाई, माजी जिल्हा अध्यक्ष व अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, विजय मेहेर, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आमदार स्नेहा दुबे यांनी सांगितले की, वसई विधानसभेतील प्रत्येक गाव व प्रत्येक वस्तीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. अर्नाळा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण या सर्व बाबींमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.
-------------------
चौकट
भिवंडीत हळदी-कुंकू कार्यक्रम
श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभास आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सधवा आणि विधवा असा कोणताही भेद न करता सर्व महिलांना समानतेचा अधिकार देण्यात येतो. स्त्री सन्मान, स्वाभिमान व सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम गेल्या २००८ पासून सातत्याने विविध तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या हळदी-कुंकू कार्यक्रमात हजारो महिलांनी एकत्र येत सधवा-विधवा असा भेद विसरून ‘स्त्री’ या एकाच ओळखीने सहभागी होत आपल्या हक्कांचा आणि सन्मानाचा उत्सव साजरा केला. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.