आपटी खुर्दमध्ये हरिनामाचा गजर
धार्मिक कार्यक्रमांची तीन दिवस रेलचेल
विक्रमगड, ता.२५ (बातमीदार)ः तालुक्यातील आपटी खुर्द येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १५ वा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा होत आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय रेलचेल अनुभवायला मिळणार आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ वाजता काकड भजन, सकाळी ७ ते ८ वा. अभिषेक, सकाळी ९ ते १२ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ वा. पुन्हा पारायण, सायंकाळी ६ ते ७ वाजता सामुदायिक हरिपाठ, रात्री ९ ते ११ वाजता कीर्तन तसेच कीर्तनानंतर जागर भजन असे कार्यक्रम होणार आहेत. रोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. सप्ताहाच्या निमित्ताने विविध गावांतील भजनी मंडळे, हरिपाठ मंडळे, कीर्तनसेवक सहभागी होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
----------------------
कीर्तनाचा सोहळा
ह.भ.प.कृष्णा कमाणकर (भेंडली), ह.भ.प.विजयदेवजी महाराज जाधव (गुजरातकर), ह.भ.प.नितीन (नामा) महाराज पाटील (शिलोत्तर) यांचे कीर्तन होणार आहे. त्यामुळे २५ ते २७ जानेवारी दरम्यान भक्तांनी कीर्तन, प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.