आरटीओ आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : ‘रस्ता सुरक्षा महिना २०२६’च्या निमित्ताने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ येथे वाहनचालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेरूळ येथील आरटीओ सीएफआर मैदानावर बुधवारी (ता. २२) हे शिबिर पार पडले.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहनचालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगळेकर तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावडे व आशीष दरगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले.
शिबिरात फुप्फुस क्षमता, रक्तदाब, ईसीजी, मधुमेह, हाडांची घनता, नेत्र व दंत तपासणी अशा विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. जवळपास २०० वाहनचालकांनी तपासणी करून घेतली. रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले, त्यात २० महिलांचा सहभाग होता. आरटीओ अधिकारी, कर्मचारी तसेच परिवहन उपक्रमातील प्रतिनिधींनीही सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.