मुंबई

प्रवासाचा वेग मंदावला

CD

प्रवासाचा वेग मंदावला
सिमेंट काँक्रीटीकरणानंतरही उड्डाणपुलांवर जीवघेणे खड्डे; वाहनचालक त्रस्त

कासा, ता. २५ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रीकरणानंतरही येथील प्रवास सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या अनेक मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अद्यापही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. मात्र, सुरक्षित म्हणूून समजल्या जाणाऱ्या याच सिमेंटच्या रस्त्यांवर चक्क मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, येथे काही ठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे, मात्र हे काम करताना कोणताही इशारा फलक न लावता फक्त बॅरिकेट्स उभारले जात आहेत. काही वेळा अपघातग्रस्त वाहनेही रस्त्यावरच उभी असल्याने पुढील अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आछाड ते घोडबंदर यादरम्यानचा जुना डांबरी रस्ता खोदून सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे कायमस्वरूपी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती, पण काही महिन्यांतच नव्याने तयार केलेल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागल्याने नागरिकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
-----------------------
चौकट
अपघाताचा धोका

विशेषतः उड्डाणपुलांवरील स्थिती अधिकच धोकादायक आहे. महालक्ष्मी उड्डाणपूल, घोळ पूल, चिंचपाडा पूल तसेच तवा परिसरातील पुलांवर चढ-उतारांवर खोल खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या या रस्त्याच्या वर आल्या असून, वाहनांच्या चाकांना तडे बसण्याचा आणि दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. घोळ उड्डाणपुलावर तर तीन ते चार इंच खोल खड्डे निर्माण झाल्याचे वाहनचालक सांगतात.

कोट
महामार्गावर विशेषतः पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. ते तात्पुरते बुजवले जातात आणि दोन दिवसांत पुन्हा उघडे पडतात. ठोस नियोजन करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अजून किती अपघात होण्याची वाट पाहत आहेत?
- राजकुमार गिरी, सामाजिक कार्यकर्ते, वाहनचालक

काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. संबंधित ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. वाहनचालकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्रबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT