मुंबई

तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

CD

तारपावादक भिकल्या धिंडा यांना ‘पद्मश्री’
आदिवासी लोककलेच्या समृद्ध परंपरेला दाद
जव्हार, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यातील वाळवंडा येथील वारली जमातीचे सुप्रसिद्ध आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना लोककलेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२६चा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दुर्मिळ आणि पारंपरिक ‘तारपा’ वाद्याचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या साधनेला या पुरस्काराने राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
२०२३ मध्ये नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमीचा २०२३चा अमृत पुरस्कारदेखील भिकल्या यांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मिळाला. शिवाय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेदेखील त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

वादन कला ७३ वर्षांपासून जपली
जव्हारच्या वाळवंडा गावचे भिकल्या धिंडा यांनी तारपावादन ही कला मागील ७३ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने जपली आहे. धिंडा यांना आदिवासी संस्कृतीत तारपा वाद्याचे महत्त्व, तारपा वाद्य बनविण्याची परिपूर्ण माहिती आहेे. प्रत्येक आदिवासी बांधवांनी ती समजून घेऊन त्याच्या जोपासनेसाठी प्रयत्न करणे अतिशय गरजेचे असल्याचे ते नेहमी सांगतात. लोककलेच्या क्षेत्रात विशेषतः तारपा वादनासाठी ओळख असलेल्या भिकल्या धिंडा यांच्या या सन्मानामुळे जव्हार तालुक्यासह पालघर जिल्हा आणि संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार केवळ एका कलाकाराचा सन्मान नसून आदिवासी लोककलेच्या समृद्ध परंपरेला मिळालेली दाद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT