मुंबई

प्रजासत्ताक दिनी सद्भाव संकल्प

CD

प्रजासत्ताकदिनी सद्भाव संकल्प
मालाड, ता. २७ (बातमीदार) : भारताच्या ७७व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त मालवणी येथील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. पालिकेचे ज्येष्ठ सफाई कर्मचारी रमेश परमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी संविधानाला साक्ष ठेवून सद्भाव संकल्प केला. “आम्ही भारताचे नागरिक या नात्याने देशातील तसेच जगातील कोणत्याही व्यक्तीशी जात, धर्म, वर्ग, लिंग, भाषा, प्रदेश आदी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही. सर्वांशी समतेने व बंधुतेने वागू आणि देशाची एकात्मता व अखंडता जपू,” अशी शपथ या वेळी घेण्यात आली.
सद्भाव मंच व जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय यांच्या वतीने सद्भाव संकल्पाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्र सेवा दल, मालवणी काचपाडा तसेच सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी सद्भाव संकल्प केला. या वेळी रमेश परमार यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. तरुण कार्यकर्त्या इशिका जैस्वार व राजेश राख पसरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास एन. एस. अली, कृष्णा वाघमारे, मेरी चेट्टी, राजकुमार दिलहोड, इशिका जैस्वार, राजेश राख पसरे, रमेश परमार, मणी चेट्टी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

Gajanan Maharaj elephants Video: शेगावातील श्री गजानन महाराजांचे हत्ती आठवतात का? रामकली-चंपाकलीचा 2007 चा व्हिडिओ व्हायरल

Lucky Mulank : 'या' मूलांकाच्या मुली लग्नानंतर नवऱ्यासाठी ठरतात लकी; घरी होतो मोठा धनलाभ, लक्ष्मीच्या पावलाने बदलतात सासरच्यांचे नशीब

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

SCROLL FOR NEXT