मुंबई

दृष्टीहीन व्यक्तींनीही अन्यायाविरुद्ध पुढे यावे

CD

दृष्टिहीन व्यक्तींनीही अन्यायाविरुद्ध पुढे यावे
कुतुब जहाँ सिद्दीकी यांचे मत

मालाड, ता. २७ (बातमीदार) : महिला व बालकांवरील अन्यायाविरोधात लढा देताना प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून, दृष्टिहीन व्यक्तीदेखील या लढ्यात प्रभावी योगदान देऊ शकतात, असे मत समाजशास्त्रज्ञ कुतुब जहाँ सिद्दीकी यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दल, मालवणी, सफल विकास वेलफेअर सोसायटी तसेच नीडा संस्थेच्या वतीने आयोजित कायद्यांविषयीच्या जनजागृती व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी दृष्टिहीन तरुण दानिश शेखच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, दृष्टिदोष असला तरी सतर्क राहणे, विश्वासू व्यक्तींना त्वरित माहिती देणे, हेल्पलाइन क्रमांकांचा वापर करणे तसेच अडचणीच्या प्रसंगी एकट्याने न जाता समूहात राहण्याचा सल्ला देणे या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्ती आपल्या मैत्रिणींना मदत करू शकतात.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना संबोधित करताना किदवाई म्हणाले की, जागरूकता, एकजूट, धैर्य आणि करुणा हीच अन्यायाविरुद्धची खरी शस्त्रे आहेत. कोणालाही एकट्याने संघर्ष करण्याची गरज नाही; सामूहिक प्रयत्नातूनच समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. सय्यद यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

फोटो - 617

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजितदादा अमर रहे... कार्यकर्त्यांच्या घोषणा

Ajit Pawar: नियतीचा योगायोग! ज्या घड्याळानं सत्ता मोजली, राजकारणात नाव दिलं; त्याच घड्याळानं अजितदादांची शेवटची ओळख पटवली

Phulambri News : 'दादा मावशींना खूप मान द्यायचे..! फुलंब्रीत मावसभावाच्या आठवणींनी डोळे पाणावले

Baramati News : दादा...तुम्ही आम्हाला का सोडून गेला; बारामतीकरांचा मेडिकल कॉलेजच्या दारात हंबरडा

SCROLL FOR NEXT