मुंबई

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम

CD

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम
रोहा, ता. २७ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ‘प्लॅस्टिकमुक्त भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ रोहाच्या रोटेरियन अल्फीया रोहावाला यांनी पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. उपस्थित महिलांना प्लॅस्टिकमुक्त पिशव्या व विचारांचे वाण वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष विजय दिवकर, पाणीपुरवठा सभापती मयूर दिवेकर व सचिव राकेश कागडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संध्या दिवकर, मानसी दिवेकर, शिवाली कागडा, पल्लवी दाते, मयुरा मोरे, अक्षता कर्णेकर, सुनीता कर्णेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नगरसेविका स्नेहा अंबरे, संजना शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या विजय दिवकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पल्लवी दाते यांनी केले.

फोटो कॅप्शन : रोटरी क्लब आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करता नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे समवेत अध्यक्ष विजय दिवकर, सभापती महेंद्र दिवेकर, अल्फीया रोहवाला आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul retirement talks: केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार? ; जाणून घ्या, त्याने स्वतःच याबद्दल नेमकं काय सांगितलय

अक्षय खन्नाच्या सिनेमात काम करण्यास मराठी अभिनेत्रीने दिलेला नकार ; आता होतोय पश्चाताप

'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू' शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाचा धमाकेदार डान्स, viral video

पुणे : १० दिवसांपूर्वी घर बदलले, रात्री लेकाचा फोटो स्टेट्सला ठेवला अन् सकाळी केली हत्या; दोघांना मारून जीवन संपवण्याचा होता विचार

Budget 2026 : बजेट 1 फेब्रुवारीलाच का सादर केल जात? पूर्वी वेगळी तारीख होती, ब्रिटिश काळातील प्रथा मोदी सरकारने का बदलली?

SCROLL FOR NEXT