कल्याणमध्ये ठाकरे गटाची झुंज
अवघ्या आठ मताने रूपा शेट्टींचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. २७ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे गट एकत्र लढत असतानाही शिवसेना ठाकरे गटाने आपली ताकद ठामपणे दाखवून दिली आहे. सत्ताधारी आघाडीसमोर ठाकरे गटाचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना दिसले. यात कल्याणच्या पॅनेल क्रमांक चारमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार रूपा शेट्टी यांचा अवघ्या आठ मतांनी पराभव झाला. निसटता पराभव त्यांच्या नशिबी आला असला तरी सत्ताधारी शिंदे गटाच्या उमेदवाराला शेवटपर्यंत घाम फोडण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक अनेक कारणांनी गाजली. शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी महायुती या निवडणुकीत होती. आता निकालानंतर महापौरपदासाठी या दोन्ही पक्षांत मिठाचा खडा पडला आहे, तर दुसरीकडे मनसेने सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शिवसेना ठाकरे गट, विरोधी बाकावर बसणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये ठाकरे गटाविषयी विश्वास वाढल्याचे दिसते. दरम्यान निकालात मिळालेल्या मतदानाची गणिते मांडली असताना जवळपास १० जागांवर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा ३०० ते १५०० मतांनी पराभव झाला आहे, पण प्रभाग क्रमांक चारमधील पराभव अधिक चटका लावणारा ठरला आहे.
प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार रुपा शेट्टी यंना अंतिम फेरीत यांना १० हजार ५६० मते मिळाली, तर शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नमिता पाटील यांना १० हजार ५६८ मते मिळाली. त्यांना केवळ आठ मतांची आघाडी मिळवता आली. प्रथमच निवडणूक रिंगणात उतरूनही रूपा शेट्टी यांनी अनुभवी उमेदवाराला टक्कर देत जोरदार लढत दिली. दरम्यान, पॅनेल क्रमांक १६ मध्ये ठाकरे गटाला निर्णायक यश मिळाले. शिंदे गटाच्या उमेदवार श्वेता जाधव यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव करत ठाकरे गटाचे नीलेश खंबायत यांनी विजय संपादन केला. मतांच्या इतक्या अल्प फरकाने मिळालेल्या या निकालांनी केडीएमसीमध्ये ठाकरे गटाची जनाधार मजबूत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.