मुंबई

धारावीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

CD

धारावीत ७७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
धारावी, ता. २७ (बातमीदार) : देशभरात ७७ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईतील धारावी परिसरातही राष्ट्रभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. धारावी व शाहूनगर पोलिस ठाण्यांमध्ये सकाळी लवकर पोलिस कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाने बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.
धारावीतील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने प्रजासत्ताकदिनानिमित्त छोट्या फेऱ्या आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. काही विद्यार्थी शालेय गणवेशात, तर काही विद्यार्थी स्वातंत्र्यसैनिक व महापुरुषांच्या वेशात उपस्थित होते. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केले होते. नवनिर्वाचित नगरसेवकांनी विविध भागांत भेटी देत स्थानिक मंडळे, संस्था व सोसायट्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. निवडणुकीत पराभूत उमेदवारही विविध कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. एकूणच धारावीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांमध्ये प्रजासत्ताकदिनाचा उत्साह दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT