मुंबई

महापालिकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

CD

महापालिकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात
गुणवंत सफाई कामगारांचा गौरव
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात सोमवारी सकाळी ७:३० वाजता महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला सलामी देत संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. मुख्यालयातील कार्यक्रमात अग्निशमन दल, सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि एमएसएफच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन करीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या सोहळ्याला शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिका उपायुक्त, सचिव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागातील १२ गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार. आयुक्तांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ध्वजारोहणानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी कॅप्टन सचान यांचे कुटुंबीय आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी डोंबिवलीतील प्रेरणा वॉर मेमोरियल येथेही भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी आमदार राजेश मोरे यांनीही उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, माजी नगरसेवक मंदार हळबे, आसावरी नवरे, खुशबू चौधरी यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दत्तनगर चौकात १५० फुटी ध्वजाचे वंदन
आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथे असलेल्या १५० फुटी उंच राष्ट्रध्वजाचेही ध्वजारोहण केले. या वेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले, की भारतीय संविधानाच्या तत्त्वांचा अंगीकार दैनंदिन जीवनात करावा आणि सुजाण नागरिक म्हणून समाजासाठी योगदान द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT