मुलुंडमध्ये ‘कलायतन’तर्फे विशेष कला प्रदर्शन
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) : मुलुंड पश्चिमेतील सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या कलायतन द आर्ट गॅलरीतर्फे एक वर्षाच्या यशस्वी कलाप्रवासानिमित्त विशेष कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जे. के. अकादमी ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्या सहकार्याने साकारलेले हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारे आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून, जे. के. जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन दि. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व कला रसिकांसाठी खुले राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.