बाजार समिती इमारतीचे भूमिपूजन
सोहळ्याला पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती
पालघर, ता. २७ (बातमीदार) : नंडोरे नाका येथील पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालय इमारतीचे भूमिपूजन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देणारी, आधुनिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत शेतकरी हितासाठी नियोजनबद्ध विकास साधणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश यांनी केले आहे.
या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे-पंडित, नगराध्यक्ष उत्तम घरत, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपसभापती उत्तम पाटील, बाजार समितीचे राज्य संचालक संचालक अनिल गावड, जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी व शेतकरी-व्यापारी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा न्यायालयीन प्रक्रियेतून कायदेशीररीत्या समितीच्या ताब्यात आली आहे. आता त्या जागेवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताची, पारदर्शक आणि कार्यक्षम बाजार व्यवस्था उभी करणे ही आपली जबाबदारी आहे. गाळे, दुकाने, शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा असलेली इमारत उभारण्याचे निर्देश त्यांनी या वेळी जिल्हा उपनिबंधकांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक समाजाचा विकास हक्काने, आत्मविश्वासाने व्हावा हीच शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, हरित विकास प्रकल्प आणि जिल्हा नियोजन व विकास आराखड्यामुळे येणाऱ्या काळात मोठा बदल घडणार असून, ‘एकही शेतकरी किंवा व्यापारी वंचित राहणार नाही’, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.