‘महानगर मराठी साहित्य संमेलन’ ३१ जानेवारीला
ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी संमेलनाध्यक्ष
मुंबई, ता. २७ : मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४७वे महानगर साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी (ता. ३१) करण्यात आले आहे. गिरगाव येथील संघाच्या डाॅ. अ. ना. भालेराव सभागृहात (साहित्य संघ मंदिर) होणाऱ्या या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी भूषविणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा तांबे स्वागताध्यक्ष असतील.
संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मुंबई आणि मुंबईतील लोकल ट्रेन’ यावर दिवसभर विविध सादरीकरणं होणार आहेत. शाहीर नीलेश जाधव यांच्या मुंबईच्या पोवाड्याने सकाळी ९ वाजता संमेलनास प्रारंभ होणार असून, संकेत तांडेल लिखित ‘लोकल’ ही एकांकिकाही सादर होणार आहे.
‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, महापालिका पुरातत्त्व खात्याचे माजी अधिकारी संजय सावंत आणि ज्येष्ठ अभ्यासक अरुण पुराणिक सहभागी होणार आहेत. गोविंद नारायण माडगावकर यांच्या मुंबईचे वर्णन आणि नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन अभिनेता दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद करणार आहेत.
मुंबईतील खाद्य संस्कृतीवर ज्येष्ठ संपादक संजीव साबडे आणि मुंबईतील वाचन संस्कृतीवर संपादक मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक रंगणार आहे. तर संमेलनाचा समारोप लोकलमधील रीलस्टार सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनांनी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.