श्री गणेश विद्यामंदिरात प्रजासत्ताकदिन उत्साहात
आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
दिवा, ता. २७ ः प्रजासत्ताकदिन श्री गणेश विद्यामंदिर शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी सर्व विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर शानदार कवायत, लेझीम, डंबेल्सचे प्रकार सादर केले. तसेच देशभक्तीपर समूहगीते ही संगीताच्या चालीवर सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिवा पोलिस चौकीतर्फे पोलिस उपनिरीक्षक दोरलेकर आणि संस्थेच्या अध्यक्षा लिलावती म्हात्रे, संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे, संचालिका केतकी म्हात्रे, गीता म्हात्रे, संचालक शिवदत्त म्हात्रे, दिनेश म्हात्रे, शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी, अनिल भोईर हे उपस्थित होते.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक एकनाथ आवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र मोंडुळे यांनी मानले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मराठी शाळेची पटसंख्या पाहून संजय खापरे भारावले
मराठी शाळा बंद पडत आहेत.,पण आज या शाळेत एवढी विद्यार्थीसंख्या पाहून मनाला खूप आनंद होत आहे. एखाद्या मराठी माध्यमाच्या शाळेत एवढी पटसंख्या असणे हे कल्पनेपलीकडचे आहे, याचे श्रेय संस्थेला व संचालक मंडळाला व शिक्षक वृंदाला दिले पाहिजे, असे गौरोद्वगार चित्रपट अभिनेते संजय खापरे यांनी काढले. शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर, माय मदर इंग्लिश स्कूल व लिलावती कनिष्ठ महाविद्यालयात वर्षभर घेतलेल्या स्पर्धा व उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ संजय खापरे यांच्या हस्ते शनिवार (ता. २४) पार पडला. या वेळी ते बोलत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.