मुंबई

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दिमाखदार सोहळा

CD

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन सोमवारी (ता. २७) कळंबोली येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात साजरा करण्यात आला. या वेळी कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या समारंभास नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, पोलिस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलिस आयुक्त दीपक समोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात राज्य राखीव पोलिस दलाचे प्लाटून तसेच परेड कमांडर सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल ग्रुप नं. ११ प्लाटून, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलिस पथक, नवी मुंबई महिला पोलिस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलिस पथक, डॉग स्कॉड बॉम्बशोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुण वाहन, वज्रवाहन, निर्भया पथके, फायर बुलेट, अग्निशामक रेस्क्यू व्हॅन सिडको आदींनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

अग्निशामक दल, महापालिका आणि सिडकोच्या पथकांनीदेखील या संचलनात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या पथकानेही आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. संचलनानंतर विद्यार्थ्यांनी विविध कवायती आणि सामाजिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सोहळ्याला नवी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलिस अंमलदार उपस्थित होते.

ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी विशेष संवाद
महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या संकल्पनेतून ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच पोलिसांप्रति त्यांच्या मनामध्ये विश्वास वाढविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या ईशान्य भारतातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांसाठी एका विशेष अनौपचारिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोकण विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना ‘डायल ११२’ या हेल्पलाइनची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यांना सुरक्षेचे आश्वासन देण्यात आले.

राष्ट्रपती पदकाने गौरव
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पोलिस निरीक्षक सुनील शिंदे. नवी मुंबई गुन्हे शाखेतील निरीक्षक सुनील शंकर शिंदे यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय सेवेबद्दल जाहीर झालेले राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT