मुंबई

मंदिरातून देव चोरीला

CD

डायघरमध्ये मंदिरांतून मूर्तीची चोरी
ठाणे : डायघर गावात अज्ञात चोरट्याने राम आणि हनुमान मंदिराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या मूर्तीसह दानपेटीतील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २५ जानेवारीला समोर आला. चोरट्याने राम मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, गणपतीची चांदीची मूर्ती आणि राधा-कृष्णाच्या पितळी मूर्ती चोरून नेल्या. चोरी करताना चोरट्याने लक्ष्मण देवाच्या धनुष्यबाणाचे टोक तोडून नुकसानही केले आहे. यासोबतच शेजारील हनुमान मंदिरातील दानपेटीवरही डल्ला मारला. याप्रकरणी पनवेल महापालिकेत सफाई कामगार असलेले गोविंद पाटील यांनी डायघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ही मंदिरे त्यांच्या वडिलांनी २००९मध्ये बांधली होती. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

घोडबंदर रोडवर महिलेचे मंगळसूत्र लांबवले
ठाणे : घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ जानेवारीला सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मठासमोर घडली. मानपाडा चितळसर येथील रहिवासी सुविता तांदळेकर (३२) या रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असताना समोरून आलेल्या दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि चेन जबरदस्तीने ओढून नेली. या दागिन्यांची किंमत साधारण एक लाख दोन हजार रुपये आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT