हत्येप्रकरणी तिघांना अटक
भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) ः भिवंडीत नातेवाईक पती-पत्नीचे भांडण मावस भावाने सोडवल्याने पतीच्या तीन सख्ख्या भावांनी भांडण सोडवणाऱ्या भावाची मनात राग ठेवून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. तिघा भावांनी मध्यस्थी करणाऱ्या भावाला सुऱ्याने भोसकून ठार केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार भिवंडीतील शांतीनगर येथील न्यू आझाद नगर झोपडपट्टीजवळ प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घडला. दिलशाद मकबूल अहमद शहा (वय २३) असे मृताचे नाव आहे, तर या हत्येप्रकरणी तिघांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसीफ अब्दुलहकीम शहा, अलीहसन अब्दुलहकीम शहा, मुझफ्फर अब्दुलहकीम शहा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलजार मकबूल अहमद शहा (२५) याचा कापडविक्रीचा व्यवसाय असून, मृत दिलशाद आणि गुलजार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. गुलजारने त्याची मावस बहीण व तिच्या पतीमध्ये २५ जानेवारीला झालेले भांडण मध्यस्थी करून सोडवले होते. या हत्येप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.