मुंबई

डोंबिवली तील दोघांसह चार जणांचा मृत्यू...

CD

देवदर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा मृत्यू
पंढरपूरजवळ अपघात; डोंबिवलीतील दोघांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागातील भाविकांच्या वाहनाला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा परिसरात भीषण अपघातात झाला. ही घटना सोमवारी (ता. २६) सायंकाळी घडली आहे. या दुर्घटनेत ठाणे जिल्ह्यातील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीमधील दोन भाविकांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच डोंबिवली पश्चिम परिसरात शोककळा पसरली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी संध्याकाळी हा अपघात झाला. यात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीमधील शेवंता हाइट्स या इमारतीतील केकाणे व गुप्ता कुटुंबीयांसह एकूण १२ भाविक दोन दिवसांपूर्वी तीर्थयात्रेसाठी सोलापूर, कोल्हापूर व पंढरपूर येथे गेले होते. महालक्ष्मी देवी, तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन सोमवारी सायंकाळी पंढरपूरकडे जात असताना हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे भाविक गाडीमधूनमधून पंढरपूर येथे जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की गाडी ट्रकसह ३० फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. या वेळी काही भाविक हे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात डोंबिवलीमधील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे, कल्याण येथील सोनम अहिरे व परळ येथील आदित्य गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेल्यांमध्ये कविता तुडस्कर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनावणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव, तसेच वाहन चालक नवनाथ हिडकिट्टी यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. डोंबिवलीमधील भाविकांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक आमदार तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदत करण्याची विनंती केली, तर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे माहिती समजताच अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या घराजवळ पोहोचले. परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT