मुंबई

पनवेल तालुक्यातील रणधुमाळीला वेग

CD

पनवेल, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण १८, तर पंचायत समितीसाठी ४६ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अनेक ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट, तर पंचायत समितीचे १६ गण आहेत. या पार्श्वभूमीवर ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी आठ गटांपैकी सात ठिकाणी दुरंगी लढत, तर एका गटात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी थेट दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये सरळ सामना रंगणार असून, एका गटात तिसऱ्या उमेदवारामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पंचायत समितीच्या १६ गणांपैकी बहुतेक गणांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने या निवडणुकीत चुरशीची आणि अनिश्चित स्पर्धा पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांमुळे अनेक गणांमध्ये मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे.

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून, स्थानिक विकास, पाणी, रस्ते, आरोग्य आणि रोजगार हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात असल्याची माहिती प्रांताधिकारी पवन चांडक यांनी दिली.

अर्ज माघारीवेळी राजकीय गोंधळ
पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पनवेल तहसील कार्यालय परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला. आदई गणातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनिता डांगरकर यांच्या अर्ज माघारीवरून शेकाप आक्रमक झाला आणि भाजपने उमेदवार पळवल्याचा आरोप करत आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. चर्चेनंतर आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर डांगरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या घटनेमुळे पनवेलच्या राजकारणात खळबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT