पालिकेच्या अर्थसंकल्पाला यंदा विलंब
अर्थसंकल्प आठ ते दहा टक्क्यांनी वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची लगबग सुरू असून, यंदाचा २०२६-२७चा अर्थसंकल्प १० दिवस उशिरा सादर होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीमुळे अर्थसंकल्पाला विलंब होणार असून, यंदा त्यात आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त दिली.
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ला संपुष्टात आला. तेव्हापासून प्रशासकीय राजवट असल्याने २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षीचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून आयुक्तांनी सादर केला होता. गतवर्षीचा अर्थसंकल्प ७४ हजार ४२७ कोटींचा होता. यंदा त्यात आठ ते दहा टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी ३१ जानेवारी किंवा ४ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प जाही होतो; मात्र यंदा महापालिका निवडणुकीमुळे अर्थसंकल्पास विलंब होणार आहे. दर पाच वर्षांनी आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प सादर करण्यास आठ-दहा दिवस पुढे ढकलण्याची तरतूद पालिकेच्या अधिनियमात असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.