मुंबई

कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले

CD

ठाकरेंच्या पोस्टर मॅनचा हृदयविकाराने मृत्यू

कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले


सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघे बेपत्ता असून, त्याविषयी ठाकरे घटाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत कल्याण डोंबिवली शहरात पोस्टरबाजी केली होती. ठाकरे गटाचे उप विभागप्रमुख रमेश तिखे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलिसांच्या दबावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण आणखीन तापले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता आहेत. यातील दोन नगरसेवकांच्या शोधासाठी ठाकरे गट प्रयत्न करीत आहे. नगरसेवक हरवल्याची तक्रार ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात केली होती. तसेच हे नगरसेवक हरवले असल्याची पोस्टरदेखील शहरात जागोजागी लावली. यावरून नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीतील उमेश म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोस्टर लावणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यातच सोमवारी पहाटे ठाकरे गटाचे पदाधिकारी यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाले. पोस्टरबाजीप्रकरणी पोलिस तिखे यांना सतत कॉल करीत असल्याने त्यांच्यावर दबाव आला आणि काल पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण पूर्व शहर युवा अधिकारी ॲड. निरज कुमार दुबे यांनी केला आहे.

एसीपी कल्याणजी घेटे यांनी पोलिसांवरील हा आरोप फेटाळून लावला आहे. यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून तक्रार देण्यात आली असून, त्यावर तपास सुरू असल्याची माहिती एसीपी घेटे यांनी दिली आहे.

कल्याण पूर्व येथील अपहृत नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याने शिवसेनेने रविवारी कल्याण पूर्वेतील प्रत्येक चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲड. कीर्ती ढोणे हे दोघे बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरातील प्रत्येक चौकात लावण्यात आले. या वेळी युवासेना शहर अधिकारी ॲड. नीरज कुमार दुबे, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, प्रकाश जाधव, शांताराम गुळवे, नितीन मोकल, अमित उगले, दत्ता पाखरे, प्रमोद परब, शशिकांत गायकर, रमेश तिखे आदींनी पुढाकार घेऊन पोस्टर्स सर्वत्र लावले.

दरम्यान, बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात संताप व्यक्त करून २५ जानेवारीला तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर कारवाईसाठी पोलिसांनी वारंवार फोन करून तिखेसह इतर कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप विभागप्रमुख रमेश तिखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.

याबाबत शिवसेना युवासेनेचे युवा अधिकारी ॲड. दुबे यांनी सांगितले, की आमच्या पक्षाच्या नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी आम्ही कल्याण पूर्व येथील चौकात बॅनर लावून त्यांना शोधण्यासाठी नागरिकांना आव्हान केले होते. मात्र माझ्या मुलाची बदनामी करीत असल्याचा आरोप करून नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी माझा मुलगा देवदर्शनाला गेला असून, शिवसैनिकांकडून त्याची पोस्टरबाजी करून बदनामी केल्याप्रमाणे त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामुळे पोलिसांचा शिवसैनिकांवर पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात आहे. या दबावामुळे होणाऱ्या तणावातून आमच्या पक्षाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याचा आरोप ॲड. दुबे यांनी केला आहे. तसेच प्रशासनाच्या चुकीमुळे ही कार्यकर्त्याची एकप्रकारे हत्या झाली असून, लोकशाही टिकवण्यासाठी आणि जपण्यासाठी शिवसैनिकांना बलिदान द्यावे लागते, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे.


चौकट

बेपत्ता नगरसेवकाचा ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून नाशिक, इगतपुरी, सिन्नर, घोटी परिसरात शोध घेतला जात आहे. परिसरातील नागरिक नगरसेवकांचे जवळचे मित्र तसेच साथीदारांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी बेपत्ता नगरसेवकांचा कसोशीने शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT