मुंबई

अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजवंदन

CD

अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषद प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे-पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
सोहळ्याला उपनगराध्यक्ष सदामामा पाटील, महाराष्ट्र परिषद सदस्य गुलाबराव करंजुळे-पाटील, स्वीकृत नगरसेवक विश्वजित करंजुळे-पाटील, नगरसेवक अभिजित करंजुळे-पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलिस प्रशासन, आरपीएफ, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी आणि अंबरनाथमधील नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानातील मूल्यांचे पालन, देशाची एकात्मता आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. दरम्यान, नगर परिषदेची इमारत तिरंग्यात न्हाऊन गेली होती. तिरंगा रंगसंगतीत केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुगे लावून केलेली सजावट नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. रात्रीच्या वेळी ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT