मुंबई

निसर्ग-केंद्रित विकासाच्या ''प्रकृति संवाद''ला मुंबईत सुरूवात

CD

‘प्रकृति संवाद’ मुंबईत सुरूवात
दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
मुंबई, ता. २७ : ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरणतज्ज्ञ के. एन. गोविंदाचार्य यांनी सुरू केलेल्या निसर्ग-केंद्रित विकासावर आधारित ‘प्रकृति संवाद’ उपक्रम आजपासून मुंबईत सुरू झाला. पहिल्याच दिवशी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम मुंबईतील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृहात पार पडला.
पाणी, मृदा आणि वनसंवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनी या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हिवरे बाजारचे पोपटराव पवार, ‘शिरपूर पॅटर्न’चे जनक सुरेश खानापूरकर, निसर्ग-केंद्रित अर्थव्यवस्थेचे अभ्यासक तुळसी तावरी, गो-आधारित अर्थव्यवस्थेवर काम करणारे संजय पटेल, ‘नदी की पाठशाला’चे सुमंत पांडे, इस्रो व बार्कचे माजी शास्त्रज्ञ डॉ. एस. मुरलीधर राव आणि अभिनेते-कवी अखिलेंद्र मिश्रा यांचा समावेश होता. निसर्ग आणि मानवी अस्तित्वाबाबत होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे सहआयोजक डॉ. रजनीश कामत यांनी गोविंदाचार्य यांचे विचार मांडले. सध्याचे विकासाचे मॉडेल निसर्गाविरोधात आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. स्वच्छ पाणी, हवा आणि शुद्ध अन्नासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. निसर्गाशी जुळवून न घेतल्यास भविष्यातील पिढीचे अस्तित्व धोक्यात येईल. समाजात जनजागृती करण्यासाठीच या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
--
गुरुवारी भाभा विद्यापीठात चर्चासत्र
‘प्रकृति संवाद’चे पुढील चर्चासत्र गुरुवारी (ता. २९) आयोजित केले आहे. या वेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. शिरीष बी. केदारे यांच्यासह पर्यावरणपूरक जीवनशैली जगणारे दिलीप कुलकर्णी आणि सामुदायिक वन व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण घालून देणारे पद्मश्री चैत्राम पवार मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT