मुंबई

एमएसएचआरसीच्या शिफरसींकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

CD

‘मानवाधिकार’च्या शिफारशींकडे सरकारचे दुर्लक्ष
साडेतीन कोटी जमा करण्याचे प्रधान सचिवांना आदेश
मुंबई, ता. २७ : महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (एमएसएचआरसी) दिलेल्या पीडितांबाबतच्या भरपाईच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारच्या कथित दुर्लक्षाबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २७) नाराजी व्यक्त केली. तसेच गृह विभागाच्या प्रधान सचिवांना १० दिवसांत साडेतीन कोटी रुपये न्यायालय रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे आदेशही दिले.
‘एमएसएचआरसी’ने १८६ प्रकरणांमध्ये राज्य सरकारला ३.३९ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते, परंतु ही रक्कम कधीही वितरित केली नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका वकील सत्यम सुराणा यांनी दाखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. त्या वेळी न्यायालयाने नुकसानभरपाईबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली. संबंधित प्रकरणांचा तपशील गोळा करण्यासाठी वाढीव वेळ देण्याची मागणी सुनावणीदरम्यान राज्य सरकारने केली. या प्रकरणात तीन महिन्यांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तरीही सरकार अद्याप माहिती सादर करू शकलेले नाही, हे अत्यंत गंभीर आहे, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच प्रधान सचिवांना १० दिवसांत साडेतीन कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले.

प्रकरण काय?
सुराणा यांच्या याचिकेनुसार, २०१३ ते २०२५ दरम्यान आयोगाने १८० शिफारशी करून भरपाई व इतर भत्ते व सवलती देण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी केवळ ४४ (२४ टक्के) शिफारशींची अंमलबजावणी झाली आहे. उर्वरित प्रकरणांबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. १३६ (सुमारे ७६ टक्के) बाबत कोणतीही कारवाई, किंवा अहवाल न देण्यात आला नाही, प्रलंबित प्रकरणांतील भरपाईची एकूण रक्कम ३.३९ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT