मुंबई

महापौर खुर्चीसाठी उल्हासनगरात रणसंग्राम

CD

महापौरपदासाठी उल्हासनगरात रणसंग्राम
शिवसेना शिंदे गट-टीम ओमी कलानीत रस्सीखेच
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २८ : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच उल्हासनगरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उल्हासनगरचे महापौरपद ‘इतर मागासवर्गीय’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि टीम ओमी कलानी यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला आहे. दुसरीकडे, बहुमतासाठी केवळ तीन मतांची गरज असलेली भाजप सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, योग्य संधीची वाट पाहत आहे.

७८ सदस्यीय उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या आकड्याची गरज आहे. शिवसेना शिंदे गटाचा वंचित बहुजन आघाडी, साई पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या जोरावर ४० नगरसेवकांचे संख्याबळ गाठल्याचा दावा आहे, तर ३७ नगरसेवकांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना सत्तेसाठी केवळ तीन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांनी तटस्थ राहण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे सत्तासंघर्ष अधिक रंजक झाला आहे.

अंतर्गत चुरस
शिंदे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले ओमी कलानी समर्थक आणि मूळ शिंदे गटाचे निष्ठावंत यांच्यात आता ओबीसीसी प्रवर्गातील उमेदवारावरून चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही गटांकडे या प्रवर्गातील अनुभवी नगरसेवक असल्याने, महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून लॉबिंगला वेग आला आहे.

भाजपची रणनीती काय?
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी ‘‘महायुतीचाच महापौर होईल’’ असे सूचक विधान केले असले, तरी अंतर्गत वर्तुळात भाजप स्वतःचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. वंचित आणि साई पक्षाच्या नगरसेवकांनी सध्या शिंदे गटाला साथ दिली असली, तरी ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निर्णायक कौल कोणाचा?
अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हातात आहे. वरिष्ठांकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, यावरच उल्हासनगरच्या सत्तेचा फैसला अवलंबून असेल.

पक्षीय बलाबल
पक्ष/गट नगरसेवक संख्या
भाजप ३७
शिंदे शिवसेना + समर्थक ३६
वंचित ०२
काँग्रेस ०१
साई ०१
अपक्ष ०१
एकूण जागा ७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT