अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी निवेदन
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) ः अलिबाग येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना सोमवारी (ता.२६) निवेदन दिले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हवले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
अंगणवाडी केंद्रांमार्फत बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांची देखभाल, लसीकरण, आरोग्य तपासणी यांसारखी महत्त्वाची कामे नियमितपणे केली जातात. मात्र, तुलनेने मिळणारे मानधन अत्यल्प असल्याची भावना अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे. ‘पोषण ट्रॅकर’ अॅपवर दररोज माहिती भरणे, अहवाल सादर करणे यामुळे अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सुपरवायझर पदाच्या अनेक जागा रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे या जागा तत्काळ भराव्यात, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. भरत गोगावले यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. तर, आमदार महेंद्र दळवी यांनीही या प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.