मुंबई

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी मनविसेचा पुढाकार

CD

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मनविसे आक्रमक
डोंबिवलीतील सर्व पोलिस ठाण्यांना निवेदन
डोंबिवली, ता. २८ : बदलापूर येथील शालेय व्हॅनमध्ये घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) पुढाकार घेत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना निवेदन देऊन शालेय वाहनांची कडक तपासणी करण्याची मागणी केली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ''मनविसे''च्या वतीने डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाणे, विष्णुनगर पोलिस ठाणे, टिळकनगर पोलिस ठाणे मानपाडा पोलिस ठाणे शहर वाहतूक शाखेला निवेदने देण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व व्हॅन आणि बसेसची नियमित फिटनेस तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सर्व चालकांचे ''पोलिस व्हेरिफीकेशन'' बंधनकारक करावे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणाऱ्या आणि नियमबाह्य खासगी रिक्षांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी शाळा परिसरात विशेष गस्त आणि मोहीम राबवावी. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. यावेळी मनविसे डोंबिवली शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपशहराध्यक्ष यतीन पाडगावकर, सुहास काळे, चिराग ठक्कर, करण काठे, गणेश कोकाटे यांसह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT