राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची ठाण्याला भेट
आढावा बैठकीसह विविध प्रकल्पांचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नुकतीच पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यानंतर त्यांनी मंगळवारी (ता. २७) ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. या वेळी, पोलिस आयुक्तालयातील कामकाजाचा आढावा दाते यांनी घेतला. याचदरम्यान, ठाणे पोलिसांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनदेखील पोलिस महासंचालकांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस सहायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सदानंद दाते ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाला भेट देत आढावा घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, काही कारणास्तव पोलिस महासंचालकांचा दौरा पुढे ढकलला होता. अखेर मंगळवारी सदानंद दाते यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, त्यांच्या हस्ते ठाणे जलद प्रतिसाद पथकाच्या नूतन कार्यालयासह साकेत हेलीपॅड येथील मियावाकी वन प्रकल्प, ठाणे शहर पोलिस अधिकारी विश्रामगृह या इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पार पडले. तसेच, पोलिस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही कमांड सेंटरलाही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर आयुक्तालयात पोलिस महासंचालक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
विद्यार्थ्यांचे कौतुक
महासंचालक सदानंद दाते यांनी ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत आयोजित ‘कार्निव्हल’मधील प्रदर्शनाला हजेरी लावली होती. या प्रदर्शनात शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रकल्पाची माहिती घेत दाते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.