मुंबई

ठाणे स्थानकात एक ''डुलकी'' पडतेय महागात

CD

ठाणे स्थानकात तीन घटनांमध्ये दीड लाखांचे मोबाईल चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः ठाणे रेल्वे स्थानकात कुठेही बसत असाल, तर जरा सावधान... कारण, प्रवासानिमित्ताने स्थानकात आल्यावर थकव्यामुळे बसल्याच जागी तत्काळ डुलकी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीच डुलकी चोरट्यांसाठी जणू संधीच घेऊन येत असल्याने वारंवार मोबाईल फोन चोरीच्या घटना समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तीन घटनांमध्ये दीड लाखांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मानपाड्यातील मनोरमा नगर येथे राहणारे ऋषिकेश पवार (२५) यांचा एक लाख १४ हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. ते १३ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे चेंबूर येथून ठाण्यात रात्री उतरले. त्यानंतर फलाट क्रमांक दोनवर कल्याणच्या दिशेकडील कट्यावर बसले. त्यांना बसल्या जागी झोप लागली आणि पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दुसऱ्या घटनेत, कळवा येथील राधेशाम वर्मा (२९) शनिवारी (ता. २४) रात्री साडेअकरा वाजता गोवा येथे कामानिमित्त निघाले होते. तिकीट काढण्यासाठी फलाट क्रमांक १ वर आले, पण तिकिटाची लाइन मोठी असल्याने लाइन कमी होण्याची वाट पाहत तिकीट बुकिंग हॉलजवळ बसले असता त्यांना झोप लागली. याचदरम्यान त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १० हजारांचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तिसऱ्या घटनेत, उल्हासनगर येथील तेजस पटेल (२४) हा तरुण सोमवारी (ता. २६) नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आला. फलाट क्रमांक ५ वरील कल्याण बाजूकडील बेंचवर बसला आणि कामाच्या थकव्यामुळे बसल्या जागी डुलकी लागली. याचदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातील २१ हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar News: वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस...; वयाचा विचित्र योगायोग

प्रत्येक सिनेमात काम करताना निर्मिती सावंतना हव्या असतात 'या' दोन गोष्टी; स्वतः केला खुलासा, म्हणाल्या, 'पहिली म्हणजे...'

Ajit Pawar Death News LIVE Updates : विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात कार्यकर्त्यांची गर्दी,

Latest Marathi News Live Update : कणखर, शिस्तबद्ध, आणि एक कार्यतत्पर नेतृत्व महाराष्ट्राने गमावले- रविंद्र चव्हाण

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा इतिहास; तासगाव तालुक्याचे निर्विवाद वर्चस्व

SCROLL FOR NEXT