पालिका अधिकाऱ्याविरोधात श्रमजीवीचे आंदोलन
भाईंदर, ता.२८ (बातमीदार): मिरा-भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्याने बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप करत श्रमाजीवी संघटनेकडून बुधवारी (ता.२८) मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.
महापालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात काम करणाऱ्या १२ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवे कामगार नियुक्त करण्यात आले. यावरून श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (ता.२७) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजपूत यांची भेट घेतली. त्यावेळी राजपूत यांनी संघटनेच्या आदिवासी महिला पदाधिकाऱ्यांसोबत बेशिस्त वर्तनाचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. राजपूत यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी भेट घेऊन त्यांना कारवाई करण्याचे निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.